देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना’ ( PM Kisan Scheme) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. देशातील बहुतांश शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ( State Government) सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या वर्षापासून ही योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे.
Cricket । क्रिकेट विश्वातून समोर आली सर्वात मोठी बातमी!
नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ( Namo Shetkari Mahasanman Yojana)
१ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे. तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार आणि लोकप्रतिनिधी शेतकरी यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक करावे लागणार आहे.
अतिक अहमदच्या पत्नीबाबत समोर आली धक्कादायक माहिती; पोलीस म्हणाले…
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय या योजनेसाठी ई केवायसी (E KYC) करणे देखील बंधनकारक असणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. राज्यात या योजनेचे ८३ लाख लाभार्थी आहेत.