राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचे पाहायला मिळतात. मुंबईत पावसाने (Mumbai Rain) जोरदार हजेरी लावली आहे. परंतु पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. ‘पहिल्याच पावसात सरकार वाहून गेलं, अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे’, असा हल्ला सरकारवर सामानातून (Samana) केला आहे. (Latest Marathi News)
Darshana Pawar । ‘अगोदर कटरने गळा चिरला, मग दगडाने डोकं ठेचलं..; राहुलने दिली खुनाची कबुली
पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे सरकारवर निशाणा साधला जात आहे. ‘अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे. मुंबईकरांवर आणखी कोणत्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ येईल, हे सांगता येत नाही. फक्त वल्गना, घोषणा आणि गर्जना यापलीकडे शिंदे-फडणवीस सरकारचे कोणतेच अस्तित्व नाही. त्यामुळे मुंबईतील मतदार उद्या पावसाच्या याच तुंबलेल्या पाण्यात बुडवतील हे विसरू नका’, असा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.
धक्कादायक! वरात दारात आणि प्रियकारसोबत पळाली तरुणी, शारिरीक संबंध ठेवले अन्..
‘यावर्षी मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही, मुंबईकरांना पावसामुळे कसलाच त्रास होणार नाही, असेही वादे मिंधे-फडणवीस सरकारने केले होते. परंतु त्यांचे हे दावे एकाच पावसात दिसले. त्यांची फेकूगिरी होती. आता जर ७० मिलीमीटर पावसामुळे मुंबईकरांचे हे हाल होत असतील तर पुढील दोन-तीन महिन्यांत काय अवस्था होणार? मुंबईकरांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनाच उफराटे सवाल करून धारेवर धरणारे राज्यकर्ते मिंधे सरकारच्या रूपाने महाराष्ट्रात असल्याचा आरोप सामानातून केला आहे.’
संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ”15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही”