मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagatsinh Koshyari) हे लातूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हमरस्त्यारील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. यावेळी कोश्यारी यांनी उपक्रम राज्यभर राबवला पाहिजे असेही आवाहन केले.तसेच या उपक्रमाचे कौतुक देखील केले.या प्रयोगामुळे पाण्याची बचत तर होणारच आहे पण पाणीपातळीतही वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, यांच्यासह अनेक कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
पावसाचे पाणी जमिनीत मुरवले
लातूर(Latur) जिल्हा हा कायम नवनवीन उपक्रम राबवण्यावर आघाडीवर राहिलेला आहे.पाण्याचा स्त्रोत नसला तरी वेगवेगळ्या माध्यमातून लातूरकर पाण्याची बचत करीत आहेत.तसेच सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर हमरस्त्यावरले पाणी(Water) एकत्र करून ते जमिनीत मुरविण्याचे शास्त्रशुद्ध कामदेखील केले आहे. त्यामुळे पाणीपातळीत भरपूर वाढ होण्यासही मदत होणार आहे.दरम्यान हा उपक्रम नेमका काय आहे? याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सोयाबीन (soybeans)उत्पादकांना राज्यपालांचा मोलाचा सल्ला
लातूर हे मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बाजारपेठ आहे. तसेच विशेष म्हणजे या बाजारपेठेची सोयाबीनचे दर ठरवण्यामध्येही महत्वाची भूमिका असते. शिवाय काळा सोयाबीन हा स्वादासाठी आणि प्रोटीनयुक्त असतात. काळा सोयाबीनचाही प्रयोग या जिल्ह्यात करावा असेही आवाहनही राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.
Thane : ठाण्यात दहीहंडी फोडताना तब्बल ६४ गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरू