Rohit Pawar : “राज्यपालांचा इतिहास कच्चा, मोदी मोठे नेते, पण…”, रोहित पवारांचे ट्विट चर्चेत

"Governor's history is raw, Modi is a great leader, but...", Rohit Pawar's tweet in discussion

मुंबई : सध्या देशाच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकीय वर्तुळात एकमेकांविरोधात जोरदार टीका टिप्पणी देखील सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील जोरदार टीका केली आहे.

रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले आहेत की, “राज्यपाल महोदयांचा केवळ 250-350 वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील 70 वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदीसाहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही”.

याचसोबत पुढे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे”.

दरम्यान, घटनात्मक पदावरील व्यक्तीने ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य करणे अतिशय निंदनीय आहे. याचसोबत आपली संस्कृती आणि सर्व भारतीय नागरिकांचे योगदान देश उभारणीत असते. देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान नसते. अस देखील रोहित पवार म्हणाले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *