Govinda | धक्कादायक बातमी! अभिनेता गोविंदाला लागली गोळी, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

Govinda

Govinda | बॉलीवूड अभिनेता गोविंदा याच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत पहाटेच्या सुमारास त्याच्या पायाला थेट गोळी लागली आहे. ही घटना घडली तेव्हा गोविंदा जुहू येथील आपल्या बंगल्यात एकटा होता. गोविंदाने आपल्या परवाना असलेल्या बंदुकीची तपासणी करत असताना चुकून बंदुकीतून गोळी सुटली, ज्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Indapur Firing । ब्रेकिंग! इंदापूर हादरलं; भर रस्त्यावर तीन राऊंड फायर, एकजण गंभीर जखमी

सुरुवातीच्या माहितीनुसार, गोविंदा पहाटे साडेपाच वाजता घराबाहेर जात असताना रिव्हॉल्व्हरचे लॉक ओपन झाले होते. गाडीत बसताना चुकून रिव्हॉल्व्हरचा खटका दाबला गेला आणि गोळी त्याच्या पायात शिरली. या घटनेनंतर तात्काळ गोविंदाला क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्याप गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे, पण त्याच्या पायाला लागलेली गोळी गंभीर असल्यामुळे त्याला विशेष देखरेखीत ठेवण्यात आले आहे.

Baramati Crime | बारामती हादरली! तुळजाराम चतुचंद महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या

या घटनेमुळे गोविंदा यांचे चाहते चिंतेत आहेत आणि सोशल मीडियावर त्याच्या लवकरात लवकर बर्‍यापैकी आरोग्याची कामना करत आहेत. अभिनेता गोविंदाची ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. यामुळे फक्त त्याच्या चाहत्यांमध्येच नव्हे, तर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. गोविंदा हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व असून, त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट आहेत.

Hiradgaon News । हिरडगाव मंदिरांच्या विश्वस्त मंडळाची निवड लांबणीवर, तरुणांची तिसरी आघाडी

Spread the love