Maratha Reservation | आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! आरक्षण देण्यास सरकार तयार पण…

Govt ready to give reservation but…

Maratha Reservation । पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच अजूनही सुटला नाही. दिवसेंदिवस आरक्षणाचा (Reservation) मुद्दा गंभीर होत चालला आहे. मराठा समाज आपल्या मागण्यांवर ठाम आहे. आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला १४ दिवस उलटूनही कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आता ओबीसी (OBC) समाज विरोध करू लागला आहे. (Latest Marathi News)

Riots in Satara । धक्कादायक! वादग्रस्त पोस्टच्या वादातून दंगल, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

“आरक्षण देण्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. परंतु त्यासाठी विरोधकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना आरक्षण देण्यात आले होते, परंतु ते दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने रद्द केले गेले. सरकारला कोणाचीही फसवणूक करायची नाही. कायद्याच्या चौकटीत राहून काम केले जाईल. आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाला विनंती आहे,” असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.

Manoj Jarange । अजित पवार यांना मनोज जरांगेंचं आवाहन; म्हणाले ‘पवारांनी चार-पाच…’

ते लांडेवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, कल्पना आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, सरपंच संगिता शेवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

World Cup 2023 । टीम इंडियाच्या चिंता वाढल्या! आशिया कप स्पर्धेदरम्यान बड्या खेळाडूला मोठी दुखापत

…नाहीतर महाराष्ट्राचा मणिपूर होईल

“मराठा समाजाला आरक्षण द्या. अंतिम टप्प्यात आलेल्या लढ्याला जर अपयश आले तर मराठा समाजातील एकाही नेत्यांना निवडून येऊ देणार नाही. रामदास आठवले यांना मदत करू. ओबीसी समाजाला उभं करायचे आणि मराठ्यांमध्ये दोन भाग करून दरी निर्माण करायची हे करू नका. हे तुम्हाला परवडणारं नाही. महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आरक्षण द्या,” असं आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केलं आहे.

Crime News । सुखी संसारात पडला मिठाचा खडा अन् घडलं भलतंच.. जाणून तुम्हीही हैराण व्हाल

Spread the love