अनेक बैलगाडाप्रेमी ( Bullock cart lovers ) यात्रा, जत्रा, उत्सव, राजकीय कार्यक्रम, वाढदिवस इ. कार्यक्रमांमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करतात. परंतु सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ( According to the new regulations of Govt ) फक्त यात्रा, जत्रा आणि उत्सव असेल तरच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे. बैलगाडा शर्यतीचे ज्यावेळी नियोजन करायचे असेल त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ( Collector’s permission ) घ्यावी लागणार आहे.
यंदाच्या वर्षी २५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरसाठी अनुदान; अर्जही झाले दाखल
बैलगाडी शर्यतीसाठी सरकारने काही नियम व अटी लावल्या आहेत. यामध्ये हजार मीटर पेक्षा जास्त बैलगाडा शर्यतीची धावपट्टी नसावी. दगड किंवा खडक असलेली, दलदल असलेली, पाणथळीची किंवा पातळ चिखल असलेली धावपट्टी शर्यतीसाठी चालणार नाही. सपाट जागेवरती बैलगाडीचा वेग मंद करण्यास जागा असावी. बैलगाडा शर्यतीचे आयोजन हे रस्त्यावर किंवा महामार्गावर करण्यात येऊ नये. बैलांना शर्यतीसाठी आणल्यानंतर त्यांना 30 मिनिटे विश्रांती देऊन बैलगाडी शर्यतीसाठी घेऊन जावे. बैलगाडी शर्यतीसाठी एका बैलाचा दिवसातून तीन वेळा शर्यतीसाठी वापर केला जाईल. बैलगाडा चालक एकापेक्षा अधिक असू नये.
सहा मुलांच्या आईवर प्रेमाचे भूत! प्रेमसंबंधांमुळे केला पतीचा खून…
बैलगाडा शर्यत सुरू असताना अन्य कोणतेही वाहन त्या धावपट्टीवर चालवू नये. बैलगाडा चालकाला कोणतीही काठी, चाबूक, पिंजरी किंवा बैलास दुखापत होईल असे साधन वापरता येणार नाही. बैलाना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे याची दक्षता बैलगाडा चालकाने घ्यावी. ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे त्या ठिकाणी योग्य निवारा, चारा व पाण्याची सुविधा असावी. बैलांना दुखापत झाल्यास त्या ठिकाणी पशुरुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध आहे का याची चौकशी करावी.
बापरे! भर रस्त्यामध्ये ‘या’ व्यक्तीने केला उर्फी जावेद हिला प्रपोज
बैलांना शर्यती अगोदर कोणतेही औषधीद्रव्ये, अल्कोहोल, क्षोभक दिले जाणार नाही. व शर्यती दरम्यान जो बैलगाडा चालक आहे त्यांना देखील अल्कोहोल दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी.१५ दिवसाच्या आत जिल्हाधिकारी यांना डिजीटल स्वरूपात २ प्रतीत सादर करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करावे. व बैलगाडा धावपटूंच्या दोन्ही बाजूला कठाडे उभा करून त्यामध्ये अंतर असल्याची खात्री करून घ्यावी.
“भाजपच्या तमाशातला नाच्या”, नितेश राणे यांच्यावर ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने केली खरमरीत टीका