Gram Panchayat Elections 2023 । मोठी बातमी! राज्यात आज 2 हजार 369 ग्रामपंचायतींमध्ये रिक्त सरपंचपदासाठी मतदान

Gram Panchayat Elections 2023

Gram Panchayat Elections 2023 । राज्यभरातल्या (Maharashtra News) 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Elections) आज मतदान (Voting) होणार आहे. तर 2 हजार 950 सदस्यपदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत. आज सकाळपासून मतदान होणार असून हे मतदान सायंकाळी ७ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर उद्या मतमोजणी होणार आहे.

Rajasthan Election । राजस्थान निवडणूक: काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची सहावी यादी, राजकीय हालचालींना वेग

महाराष्ट्रातील लोकसभा आणि निवडणुकीची आज पहिली झलक आज पाहायला मिळणार आहे. कारण राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वच ग्रामपंचायत मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस देखील सज्ज झालेले आहेत.

Accident News । ब्रेकिंग न्यूज! भाजप खासदाराच्या गाडीचा भीषण अपघात

निवडणूका होणारे जिल्हे कोणते?

नागपूर, अमरावती, भंडारा, वाशीम, गोंदिया, बुलढाणा, वर्धा, नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, लातूर, बीड, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, चंद्रपूर, अमरावती, गोंदिया, परभणी, सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, अकोला, नांदेड, वर्धा, ठाणे, यवतमाळ, रायगड, जळगाव, संभाजीनगर, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये निवडणूक होणार आहेत.

Mark Zuckerberg Injury । मोठी बातमी! फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गचा मोडला पाय; रुग्णालयात दाखल

Spread the love