Site icon e लोकहित | Marathi News

गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने डॉ.दिपक दादाराव जाधव यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान भव्य सोहळा पुणे येथे संपन्न!

Pune News

पुणे-चिंचवड येथील ग. दि. माडगुळकर सभागृहात, 20 एप्रिल 2024 रोजी नेपाळ पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लालबहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय विविध कार्य करणाऱ्या गुणीजनांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. डॉ.दिपक जाधव हे Talentakatta.com या कंपनी चे संस्थापक अद्यक्ष आहेत अनेक वर्ष कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

Rakhi Sawant । सर्वोच्च न्यायालयाचा राखी सावंतला मोठा धक्का! दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

टॅलेंट कट्टा ही संस्था अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाशी संलग्न आहे तसेच Talentkatta.com च्या माध्यमातून कलाकारांना रोजच्या रोज खात्रीशीर आणि चांगल्या प्रोडक्शनच्या ऑडिशन जातात त्यामध्ये सिरीयल,नाटक ,शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म व जाहिरात फिल्म Talentkatta.com च्या माध्यमातून 9 वर्षांमध्ये 8000 पेक्षा जास्त कलाकारांना काम भेटले आहे आणि अजूनही टॅलेंट डॉट कॉम यशस्वी कास्टिंग कंपनी म्हणून कार्य करत आहे आणि कलाकारांचा विश्वास जिंकत आहे.

Loksabha Election । लोकसभेत भाजपने उघडलं विजयाचं खातं, ‘या’ मतदारसंघात उधळला गुलाल

या कार्यक्रमास समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, ,डॉ. आशा पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक रक्षक समिती, डॉ महेंद्र देशपांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, डॉ.प्रा. श्वेता सचिन चौगुले सिध्दरेखा फाऊंडेशन भारत संस्थापक अध्यक्ष गांधी पीस फाउंडेशनचे भारताचे प्रभारी डॉ. सूनिलसिंह परदेशी आदी मान्यवर प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.

Jitendra Awhad । बिग ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या निशाण्यावर, लाखोंची मागणी करत…

प्रास्ताविक डॉक्टर सुनील सिंह परदेशी यांनी केले तर मनोगत पद्मश्री गिरीजी प्रभुणे, डॉक्टर आशाताई पाटील व डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी व्यक्त करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन डॉ.दिपक दादाराव जाधव यांना ऑनररी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ह्यावेळी आयोजक डॉ. राजेंद्रसिंह वालीया डॉ.दिपक जाधव यांनी सर्वांचे आभार मानले

Sharad Pawar । भरसभेत शरद पवारांनी मान्य केली चूक, म्हणाले; “पाच वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची माफी…”

मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थींनी आनंद व्यक्त करून आपल्यावर सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचे मनोगत व्यक्त केले त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Spread the love
Exit mobile version