श्रीगोंदा : हिरडगाव येथे प्रा.स्व.तुकाराम नाना दरकेर यांच्या स्मरणार्थ २८ ऑक्टोबर २०२२ रोजी एकदिवशीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भव्य बक्षिसांचे वितरण होणार आहे. प्रथम बक्षीस २१०००, द्वितीय बक्षीस १५०००, तृतीय बक्षीस ९०००, चतुर्थ बक्षीस ५००० अशा प्रकारे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
दुधाचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढणार? वाचा सविस्तर
कबड्डी स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून पारनेरचे आमदार माननीय श्री.निलेश लंके व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पेडगाव सोसायटीचे चेअरमन श्री.रोहिदास किसन पवार उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन समस्थ ग्रामस्थ हिरडगाव यांच्यातर्फे जि.प.प्रा. शाळा हिरडगाव या ठिकाणी होणार आहे.
‘या’ जिल्ह्यात घडला धक्कादायक प्रकार, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी
या स्पर्धेसाठी संघ नोंदणी फोनद्वारे केली जाणार आहे. ही नोंदणी दि.२८ ऑक्टोबर २०२२ ला सकाळी ९ वाजेपर्यंत केली जाईल. संघ नोंदणीसाठी प्रवेश फी रु.७०० आकारलेले आहे.
धक्कयादक! दहावीच्या विद्यार्थिनीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या
संघ नोंदणीसाठी संपर्क –
१) श्री.शुभम म्हस्के – ७५१७०२९१७१
२) श्री.सुनील दरेकर – ७५५८४३०६८१
३) श्री.महेश म्हस्के – ९९७५५९६७६९
४) राहुल.वि.दरेकर – ७३८७२९२०५६
अरे हे काय घडलं? पोलिसांना दंड घेण्याऐवजी भरावा लागला भुर्दंड; वाचा पुण्यातील किस्सा