सोशल मीडियावर (Social Media) अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. माणसांचे, पाळीव प्राण्यांचे, जंगली प्राण्यांचे, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे मात्र हा व्हिडीओ कोणत्या प्राण्याचा नसून तो एका माणसाचा आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की, एक वयोवृद्ध व्यक्ती गाडी चालवत आहे. आता तुम्ही म्हणताल गाडी तर चालवर आहे त्यामध्ये एवढं विशेष काय आहे? पण तुम्ही जर व्हिडीओ पहिला तर तुमच्या लक्षात येईल की ही वयोवृद्ध व्यक्ती हात सोडून गाडी चालवत आहे. त्याचबरोबर डान्स देखील केल्याचे दिसत आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘याला आत घ्या. आत सुरक्षित राहील साहेब’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘जबरदस्त एक नंबर’ त्याचबरोबर काही लोक हसण्याचे ईमोजी देखील कमेंट करत आहेत.