मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ म्हणजेच ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या विभागीय स्तरावर ५० लाख तिरंग्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार आहे. यासाठी इक्बाल सिंग चहल यांनी काल बीएमसी मुख्यालयात बैठक घेतली.
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 4, 2022
राज्यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान #घरोघरीतिरंगा अभियान साजरे होणार आहे. हे अभियान का राबविले जात आहे, यात सामील कसे व्हावे, झेंडा कुठे मिळणार, तो कसा उभारावा आणि कोणकोणती काळजी घ्यावी, याबाबतची माहिती देणारा लघुपट पाहा…#हरघरतिरंगा#HarGharTiranga pic.twitter.com/p6wkH7eJ6H
या बैठकीमध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त आशिष शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगर) डॉ. संजीव कुमार, सहायक आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिंद सावंत, सहायक आयुक्त डॉ. (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सर्व परिमंडळ सहाय्यक आयुक्त/उपायुक्त, इत्यादी उपस्थित होते.