Crime News । पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे (Crime in Pune) प्रमाण झपाट्याने वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. कायदे कठोर करूनही गुन्ह्यांचे (Crime) प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुण्यात टोळक्यांनी धुमाकूळ घातला आहे. (Latest marathi news)
Dolly Chaiwala । अरे बापरे! चायवाला डॉली आहे लाखो रुपयांचा मालक, आकडा जाणून तुम्हालाही बसेल धक्का
खडकवासला भागात 10-12 जणांच्या टोळक्याने काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने सपासप वार केले आहे. ही घटना गोऱ्हे बुद्रुक गावातील असल्याचं सांगितलं जातंय. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून ज्यात 10-12 जणांच्या टोळक्याने कोयते-तलवारीने 3 जणांवर हल्ला केल्याचे पाहायला मिळत आहे.
Amravati News । बच्चू कडू समर्थक-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, नेमकं कारण आलं समोर
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला भररस्त्यात केला. रस्त्यावर इतर लोकांची ये-जा सुरू असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तरीही या गुंडांना कसलीही भीती नाही. या टोळक्याने दुचाकी अडवून गाडीवरील तरुणांवर कोयता आणि तलवारीने वार करत लोकांना जखमी केलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Loksabha Election 2024 । ब्रेकिंग! महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागा लढवणार?