मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवारी सकाळी ठीक ११:०० वाजता सामूहिक राष्ट्रगीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राज्यातील प्रत्येक नागरिकाला ‘सामूहिक राष्ट्रगीत (National Anthem) उपक्रमा’त सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
राज्यामध्ये सध्या ‘स्वराज्य महोत्सव’ सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन हा उपक्रम राबविण्यात येत आज. . राज्यातील असंख्य नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील सर्व लोकांपर्यंत पोहचावा यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय (Saurabh Vijay) यांनी सांगितले की, आपली संस्कृती जपण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमातून उपक्रम राबवले जात आहेत. राज्यभरतील अंगणवाडय़ा, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, खाजगी- शासकीय सर्व शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थी, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर राज्यातील इतर सर्व नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हाव़े. असेही सरकारने (Govt) स्पष्ट केले.