बरेच शेतकरी कापूस पिकाचे उत्पादन घेत आहेत. परंतु शेतकऱ्यांचं (Farmers) दुर्दैवच म्हणाव लागलं की, मागच्या काही वर्षापासून कापूस पीक (cotton crop) तोट्याचे ठरत आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे कापूस पिकाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इतकंच नाही तर पाऊस आणि कीड तसेच रोगामुळे कापूस पिकाचे नुकसानही वाढले आहे. त्यामुळे तेलंगणामधील शेतकऱ्यांनी कापसाला किमान १२ हजार रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान आपल्या मागण्यांसाठी हे शेतकरी सलग तीन दिवस निदर्शने करणार आहेत.
धक्कादायक! गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण होरपळले, तर १० जण गंभीर जखमी; वाचा सविस्तर
यंदा देशात कापूस लागवडी वाढली असून तेलंगणातही कापसाखालील क्षेत्र वाढून २० लाख हेक्टरवर पोचले. परंतु फक्त उत्पादन वाढून काय करता शेतकऱ्यांना कापूस शेतीतून मिळणारा मोबदला घटला आहे. महत्वाची बाब म्हणजे कापूस बियाणे (Cotton seed), खते आणि कीटकनाशकांचे दर सतत वाढत आहेत. तर कापूस वेचणीसाठीची मजुरीही मोठ्या प्रमाणात वायएवढच नाही तर मध्येच अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींनी होणारे नुकसान वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना (farmers) एकरी फक्त ४ ते ५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे.
साखर कारखान्यांचे वजन काटे तातडीने ऑनलाईन करा, राजू शेट्टी यांची वैद्यमापन नियंत्रकांकडे मागणी
दरम्यान यावर्षी सरकारने कापसाला ६ हजार ८० रुपये हमीभाव जाहीर केला. या हमीभावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाही. याच कारण म्हणजे शेतकऱ्यांना एक क्विंटल कापूस उत्पादनासाठी जवळपास ८ हजार रुपये खर्च यतो. याचा अर्थ असा की, सध्या कापूस उत्पादकांना क्विटंलमागे २ हजार रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना सरकारने किमान १२ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी तेलंगणामधील शेतकऱ्यांनी केली आहे.
अभिनेत्री अमृता सुभाष ४३ व्या वर्षी होणार आई?, इन्स्टाग्राम पोस्टने वेधल सर्वांचं लक्ष