Gujarat Bridge Collapse । मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये पूल कोसळला, एकाचा जागीच मृत्यू; ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

Gujarat Bridge Collapse । गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी निर्माणाधीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. ओव्हरब्रिजचा मोठा भाग कोसळला आणि या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला झाल्याची देखील माहिती मिळत आहे.

Gopichand Padalkar । धनगर आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकर यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

सध्या या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हिंदी न्यूज ANI या ट्विटर अकाउंट वरून या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. माहितीनुसार या अपघातामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षाचालक जीव वाचवण्यासाठी धावत असताना अचानक पुलाचा स्लॅब कोसळल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Gujarat Bridge Collapse )

Dhangar Reservation । धक्कादायक! मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणासाठी तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्यास सुरुवात केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

Ajit Pawar । अजित पवारांचं मराठा आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, “मागण्या टाळतोय…”

Spread the love