Gujarat Bus Accident । सध्या एका प्रवाशी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासी बस रस्त्यावरील रेलिंग तोडून 25 फूट खाली पडली आणि मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. गुजरातच्या नडियादमधील अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे तेथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
अहमदाबादहून पुण्याला जात होती. या बसमध्ये 20 हून अधिक जण प्रवास करत होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Gujarat Bus Accident)
Fire News । झोपडीला लागली आग, मुलींचा मोठा आक्रोश; अन् काही क्षणातच आगीत ४ बहिणी जिवंत जळाल्या
याबाबत अधिकची माहिती अशी की, बस अहमदाबादहून पुण्याला जात होती. या बसमध्ये सुमारे 23 प्रवासी होते. सिमेंट टँकरच्या चालकाने अचानक वाहन डावीकडे वळवल्याने बसला धडक बसली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil । उद्या आंदोलन कसं असणार? मनोज जरांगे यांनी केली याबाबत सर्वात मोठी घोषणा
दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्यास सुरवात केली. उशिरापर्यंत मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.
Ajit Pawar । भर सभेत अजित पवार अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले, ‘मस्ती आली आहे का?’
#WATCH | Gujarat: A bus broke the roadside railing and fell 25 feet down on the roadside on the Ahmedabad-Vadodara Expressway in Nadiad. pic.twitter.com/VSV9W6shvZ
— ANI (@ANI) February 23, 2024