
Gujarat Titans IPL २०२३ : भारतीय गोलंदाज आशिष नेहराचा (Ashish Nehra) संयम सुटताना तुम्ही किती वेळा बघितल आहे? आशिषने शुभमन गिलच्या शतकाच सेलिब्रेशन सुद्धा केलं नाही. संपूर्ण टीमने सेलिब्रेशन केलं परंतु आशिष स्वतःच्या जागेवरून उठलाच नाही. खेळाडू म्हणून आशिषला तुम्ही एक दोन वेळा संतापलेलं बघितलं असेल. तो आशिष नेहरा आता गुजरात टायटन्सचा कोच आहे.
IPL २०२२ मध्ये डेब्यु केल्यापासून गुजरात टायटन्सची टीम वेगळ्याच फॉर्मला आहे. २०२३ च्या आयपीएलच्या पॉइंट टेबल मध्ये गुजरात टायटन्सने संपूर्ण सीजन पहिला क्रमांक सोडला नाही. चालू सीझनमध्ये देखील गुजरात टायटन्स प्लेऑफ मध्ये गेलेला पहिलाच संघ आहे. गुजरात टायटन्सची मॅच चालू असताना आशिष नेहराच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य दिसते परंतु, डगआऊट मध्ये असताना त्याच्या चेहऱ्यावरती खूप अस्वस्थता जाणवते. तो नेहमी हार्दिक पांड्याच्या कानात काहीतरी सांगत असतो. मेंटॉर गॅरी कस्टर्न यांच्याबरोबर सतत चर्चा करतानाही दिसतो. त्याच चर्चेवेळी आशिषचा संयम सुटला.
Arjun Tendulkar । ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! अर्जुन तेंडुलकर जखमी
सोमवारी क्रिकेटच्या चाहत्यांना एक वेगळाच आशिष नेहरा पाहिला. गुजरात टायटन्सने अगदी सहजपणे घरच्या मैदानावर यश मिळवले. गुजरात टायटन्सने सहजपणे प्लेऑफ मध्ये पदार्पण केले. पण याच मॅचमध्ये आशिष नेहराचा संयम सुटलेला ही पाहायला मिळाले एकवेळ त्यांचे ५९ रन्सवर ७ विकेट गेले होते. सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) टीमने सोमवारी राजस्थान रॉयल्स सारखी खेळी दाखवली. गुजरातच्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. एकवेळ त्यांचे ५९ रन्सवर ७ विकेट गेले होते. पण अखेरीस SRH टीमने ९ बाद १५४ धावा केल्या.
सर्वात मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? काय असेल नवीन नाव?
आशिष नेहरा नेमका का चिडला?
नेहरा मैदानात संतापल्याचं चित्र पहिल्या इनिंग्स मध्ये दिसलं. ओपनर वुद्धिमान साहा (vriddhiman Saha) पहिल्या ओव्हरमध्ये डकवर आऊट झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली. गिल आणि सुदर्शन खेळत असताना गुजरातची टीम सहजपणे २०० धावांचा टप्पा पार करेल असं वाटत होतं. परंतु शेवटच्या टप्प्यात गुजरातची टीम कोलमडली. त्यामुळे आशिष नेहरा प्रचंड चिडल्याचं दिसलं.