Site icon e लोकहित | Marathi News

Gujarat Vadodara News । गुजरात दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू

Gujarat Vadodara News

Gujarat Vadodara । गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. हर्णी तलावात बोटिंगसाठी गेलेले 25 हून अधिक विद्यार्थी बोट उलटल्याने बुडाले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 12 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. तलावात बोटींग करताना विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट न घालता बोटीत बसवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच 16 क्षमतेच्या बोटीत 25 हून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यामुळे तलावात बोट उलटली. (Gujarat Vadodara Children Drowned)

Rajasthan News । धाकट्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून मोठ्या भावाने सोडला जीव; घटना वाचून डोळे पाणी येईल

मिळालेल्या माहितीनुसार, हर्णी तलावात २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी भरलेली बोट पलटी झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ बचाव मोहीम राबवून काही विद्यार्थ्यांना वाचवले. तलावातून बाहेर काढलेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच डीसीपी, एसीपी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. या अपघातावर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

Ravikant Tupkar । आताच्या घडीची मोठी बातमी! रविकांत तुपकर यांना पोलिसांनी केली अटक

वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असंही ते म्हणाले आहेत. असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Gujarat News । गुजरातमध्ये भीषण अपघात, 25 हून अधिक विद्यार्थ्यांसह बोट तलावात बुडाली, आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू

Spread the love
Exit mobile version