राज्यात जवळपास 7 हजार 135 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूका ( Grampanchayat election 2022) जाहीर झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर रविवारी ( दि.18) बहुतेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचे निकाल आज हाती आले आहेत. यावेळी सरपंच हे थेट जनतेतुन निवडून आले आहेत, दरम्यान अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती या निवडणुकीमुळे चर्चेत आल्या आहेत.
राष्ट्रपतींना मिळतो लाखोंचा पगार; जोडीदारासाठी सुद्धा दिल्या जातात ‘या’ खास सुविधा!
महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज ( Indurikar Maharaj) यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती सरपंच झाल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. ग्रामीण भागात इंदुरीकर महाराज यांना त्यांच्या किर्तनामुळे प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांच्या खास विनोदी शैलीमुळे लोक त्यांचे कीर्तन मोठ्या प्रमाणात ऐकतात.
तेजस्विनी पंडितचा मोठा खुलासा; थेट नगरसेवकानेच दिली ‘ही’ ऑफर
इंदुरीकर महाराज म्हणजेच हभप निवृत्ती महाराज देशमुख – इंदुरीकर यांच्या सासूबाई शशिकला पवार या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक 2022-23 मध्ये सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यात असणाऱ्या निळवंडे गावात त्या सरपंच पदासाठी उभ्या होत्या.
शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर बंदी! भीमा कोरेगाव येथे जय्यत तयारी
राज्यात झालेल्या या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चढाओढ दिसून आली. परंतु, महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंदुरीकर महाराज यांच्या सासू शशिकला पवार या कोणत्याही राजकीय पक्षाकडून सरपंच पदाची निवडणूक लढल्या नसून अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज केला होता.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मोठी मागणी