Gunaratna Sadavarte । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक एसटी कर्मचारी सोसायटीचे संचालक सदावर्ते यांची साथ सोडणार आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. 17 संचालक हे गुणरत्न सदावर्ते यांची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Breaking News)
Raj Thackeray । मराठी पाट्या लावा नाहीतर तोंडाला काळ फासू – मनसे आक्रमक
एसटी कर्मचारी बँकेच्या 19 पैकी 14 संचालक हे नॉटरीचेबल असल्याची माहिती मिळत समोर आली होती. त्यानंतर आता खानदेशातील चारही जिल्ह्यांमधील सर्व 17 संचालक हे गुणरत्न सदावर्ते यांची साथ सोडणार आहेत. त्यामुळे सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मागच्या काही दिवसापूर्वी एसटी कर्मचारी बँकेचे काही संचालक नॉटरीचेबल आहेत ते अजूनही आलेले नाहीत यावर देखील सदावर्ते यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. हे सर्व घडत असतानाच आता धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार या ठिकाणचे कर्मचारी सोसायटीच्या सर्व १७ संचालकांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व संचालक गुणरत्न सदावर्ते यांची साथ सोडून एका मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये ते मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश देखील करतील. त्यामुळे सदावर्ते यांना मोठा धक्का बसणार आहे.