Gunaratna Sadavarte । सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर मराठा बांधव देखील आता मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही शांततेत आंदोलन करतोय त्यामुळे कोणीही जाळपोळ करू नये, तोडफोड करू नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील सतत करत आहेत. मात्र मराठा तरुणांचा संयम आता सुटलेला पाहायला मिळत आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना दणका दिला आहे. या तरुणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मराठा तरुणांनी आज सकाळच्या सुमारास त्यांच्या घराकडे जाऊन ही तोडफोड केली आहे.
गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवर या ठिकाणी राहत असून त्यांच्या पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांची मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. हे तरुण हातात काठी घेऊन आले आणि बेधडकपणे त्यांच्या दोन गाड्यांच्या काचा फोडल्या तरुण अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली आहे. त्याचबरोबर यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील देण्यात आल्या आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातील सभेलाही विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली होती. त्यामुळे याच रागाच्या भूमिकेतून या तरुणांनी त्यांच्या वाहनांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता या तरुणांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये वाहनांची प्रचंड तोडफोड झाल्याचे दिसून येत आहे.
Samruddhi Mahamarg Accident । समृद्धी महामार्गावर पिकअपचा भीषण अपघात! १४ जण गंभीर जखमी