
Gutami Patil । महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. तिचे असंख्य चाहते आहेत. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला गोंधळ होतो. त्यामुळे कार्यक्रम (Gutami Patil Event) पोलीस बंदोबस्तात पार पडतो. गौतमी पाटील सध्या एका वेगळ्याच कारणावरून चर्चेचा विषय बनली आहे. तिला पत्रकारांकडून आरक्षणाबाबत (Maratha Reservation) प्रश्न विचारण्यात आला. (Latest Marathi News)
Chhagan Bhujbal । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांना मोठा दिलासा
आरक्षणाच्या मुद्दयावर गौतमी म्हणाली, “आज प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे. मलाही आरक्षण (Gutami Patil On Reservation) हवं आहे. मला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे.” तिच्या या उत्तरावरून पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आरक्षणाच्या मुद्दयावरून गौतमी पाटील चर्चेत आली आहे. दरम्यान, लवकरच गौतमीचा चित्रपट (Gutami Patil Film) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिनेच या चित्रपटाची घोषणा केली होती.
Political News । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून गदारोळ माजला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याशिवाय मराठा आरक्षणावरुन नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच गौतमीचे वक्तव्य चर्चेत आले आहे.
ST Mahamandal । भारीच! खिशात एकही रुपया नसताना करता येणार लालपरीने प्रवास, कसं ते जाणून घ्या