Gyanvapi Masjid । उत्तर प्रदेशातील (UP) वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अयोध्येमधील बाबरी मशिद (Babri Masjid) पाडल्यानंतर प्रशासनाकडून ज्ञानवापीच्या चारी बाजूंना लोखंडाचे बॅरिकेंडिग लावण्यात आले होते. त्यामुळे मशिदीच्या तळघरात जाण्यास परवानगी नव्हती. याप्रकरणी कोर्टाने (Varanasi Court) मोठा निर्णय घेतला आहे. (Latest marathi news)
वाराणसी कोर्टाकडून आता मशिदीच्या तळघरात पूजा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता हिंदू पक्षकारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे ज्ञानवापी परिसरातील ‘व्यास का तैखाना’ येथे हिंदूंना आरती-पूजा करता येणार आहे. याबाबत कोर्टाने जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत. येत्या सात दिवसात यासंदर्भात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश दिले आहेत.
ज्ञानवापी मशीद वाद प्रकरण
ज्ञानवापी मशीद औरंगजेबाने बांधली असे मानले जाते. पण हिंदू बाजू म्हणते की मशिदीच्या अगोदर त्याच ठिकाणी मंदिर होते. मुघल शासक औरंगजेबाने 1699 मध्ये काशी विश्वनाथ मंदिर पाडून त्याजागी मशीद (Gnanawapi Masjid Controversy) बांधली होती. भगवान विश्वेश्वराचे स्वयंभू ज्योतिर्लिंग मंदिरात विराजमान होते, असा दावा करण्यात येतो. अशातच या मंदिराचे अवशेषही मशिदीत सापडतात.
Maratha resevation । मोठी बातमी! ओबीसी संघटनांनी दिले मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान