मुंबई | शिंदे गटातील नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. सध्या राजकारणात त्याची प्रचंड चर्चा सुरु आहे. रविवारी उद्धव ठाकरेंची मालेगाव येथे सभा पार पडली. या सभेमध्ये ठाकरेंनी शिंदे गट आणि बंडखोर आमदाराविरोधात भाष्य केलं.
धक्कादायक घटना! लग्नाच्या अमिषाने 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ठाकरेंच्या या विधानानां उत्तर देताना संजय शिरसाट यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे(Ambadas Demons) माझ्या संपर्कात आहेत. कधीही काहीही होऊ शकत अस वक्तव्य शिरसाटांनी केलं आहे. दानवे काही दिवसात शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं शिरसाट म्हणाले.
अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूप्रकरणी मेकअप आर्टिस्टने केला धक्कादायक खुलासा!
उद्धव ठाकरे आम्हाला गद्दार म्हणत आहेत. मात्र गद्दरी आम्ही नाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे. असा उलटवार शिरसाटांनी केला. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच उद्धव ठाकरे मजबूरीनं राहत असल्याचंदेखील शिरसाट म्हणाले.
सरकारी जाहिरातीवरून अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “हजारो कोटी रुपयांचा खर्च…”
मविआकडून (MVA) घेण्यात येणाऱ्या सभांवरदेखील शिरसाटांनी टोला लगावला. प्रत्येक सभेची तयारी ठाकरे गटानं करायची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिथे जाऊन भाषणं ठोकायची, असं सगळं सुरू आहे.ज्या शिवसैनिकांनी त्यांच्या रक्तानं वाढवली, मोठी केली त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरा, राष्ट्रवादीच्या लोकांसाठी नको. असा सल्लादेखील शिरसाटांनी ठाकरेंना दिला.