दहावी व बारावीच्या गुणांवरून करिअरची दिशा ठरत असते. म्हणून या परीक्षांना प्रचंड महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक ( SSC) व उच्च माध्यमिक शिक्षण ( HSC) मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावाची परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत.
अडवणूक करून शेतकऱ्यांची लूट! ऊसतोडणीसाठी मुकादम स्वतःच ठरवू लागलेत दर
आता दहावीच्या लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ६ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये हे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 ची दहावी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहेत.
अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ
दरम्यान, परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर अनुचित व गैरप्रकार घडू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षाकेंद्रावर ( Exam Centre) बैठे पथक पूर्णवेळ थांबणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
बिग ब्रेकिंग! मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, NIA ला आला धमकीचा ईमेल