शिव ठाकरे हिंदी बिग बॉस सीझन 16 (Hindi Bigg Boss Season 16) मध्ये सहभागी झाल्यापासून तो सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. शिव ठाकरे (Shiv Thackeray) कायमच सर्व प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. शिव ठाकरे सोशल मीडियावर (Social media) ट्रेंडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान त्याच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज समोर आली आहे.
मुकेश अंबानी आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावर; तर गौतम अदानी थेट…
शिव ठाकरेला मराठी चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. त्यामुळे शिव लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. तो लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे मोठ्या पडद्यावर त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
मोठी बातमी! बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टक्कर देणार ‘ही’ महिला उमेदवार
शिव ठाकरे हा निर्माते अमोल खैरनार यांच्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. टू इडियट्स फिल्म या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही मात्र अमोल यांनी शिवसोबत एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बिग बॉस फेम शिव ठाकरे. आपल्या पुढचा मराठी हिरो. मला शिव ठाकरेचा अभिमान वाटतो. मराठी मुलगा.’