मुंबई : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा छाप पाडली. सेंट किट्समध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान त्याने चेंडूने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. हार्दिक आता टी20 मध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 50 पेक्षा जास्त विकेट घेणारा भारताचा एकमेव पुरुष अष्टपैलू खेळाडू बनला आहे.
भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने २०२१ च्या विश्वचषकानंतर पुनरागमन केल्यापासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हार्दिक पांड्या टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर जवळपास 6 महिने मैदानाबाहेर होता, परंतु IPL 2022 मध्ये पुनरागमन केल्याने तो देखील त्याच्या फॉर्ममध्ये परतला आणि पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. हार्दिक पांड्याने पुनरागमन केल्यापासून तो केवळ फलंदाजीतच उत्कृष्ट फॉर्म दाखवत नाही तर गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 बळी घेणारा हार्दिक भारताचा सहावा गोलंदाज ठरला. हार्दिकच्या आधी भारताकडून युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे. चहलच्या नावावर भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे. चहलने एकूण 79 विकेट्स घेतल्या आहेत.