Hardik Pandya । हार्दिक पांड्याला सर्वात मोठा धक्का; कुटुंबातील अतिशय जवळच्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक

Hardik Pandya

Hardik Pandya । सध्या आयपीएलचा (IPL 2024) थरार सुरु आहे. क्रिकेटप्रेमी दूरदूरवरून आपल्या आवडत्या संघांचे सामने पाहायला येत आहेत. यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा संघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. संघाला आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकता आला आहे. अशातच आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Pune Crime । पुण्यात नेमकं चाललंय काय? आधी समोस्यात कंडोम, आता बर्फाच्या लादीत….

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याचा (Krunal Pandya) सावत्र भाऊ वैभव पांड्याला (Vaibhav Pandya) तब्बल 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वैभव पांड्यावर फसवणूकीचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता वैभव पांड्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

Congress । ब्रेकिंग! काँग्रेसने जाहीर लोकसभेची तिसरी यादी; या नेत्यांना मिळाली संधी

वैभव पांड्याने मुंबईतील पार्टनरशिप फर्ममधून सुमारे 4.3 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. 2021 मध्ये हार्दिक, क्रृणाल आणि वैभव पांड्याने मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला. भागीदारीच्या अटी अशा होत्या की हार्दिक, क्रृणाल प्रत्येकी 40% भांडवल घालतील तर वैभव 20 टक्के घेऊन दैनंदिन कामकाज हाताळतील. नफा देखील त्याच प्रमाणात वाटला जाणार होता. पण भागीदारी कराराचे उल्लंघन करत वैभवने त्याच व्यवसायात दुसरी फर्म सुरु केली. यामुळे मूळ भागीदारीचा नफा खूप कमी झाला.

Ajit Pawar । “मी तोंड उघडल्यास…” अजित पवारांनी दिला कुटुंबातीलच व्यक्तींना गंभीर इशारा

Spread the love