
सध्या सगळीकडे आयपीएलचा माहोल सुरू आहे. अशातच गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गुरुवारी (ता.13) पंजाब विरोधात झालेल्या सामन्यातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या आपल्याच टीममधील खेळाडूबरोबर चुकीचे वर्तन करत आहे. यामध्ये तो प्रचंड वैतागल्याचे दिसून येत आहे. हार्दिक पांड्याचे ( Hardik Pandya) हे वागणे पाहून त्याचे चाहते सुद्धा थक्क झाले आहेत.
रितेश देशमुखने केला पहिल्या प्रेमाचा खुलासा; म्हणाला, “ते माझं प्रेम अपूर्ण…”
हा व्हिडीओ ( Viral Video) पाहून नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच झालं असं की, पंजाब विरुद्धच्या सामन्यात डीप कव्हरला क्षेत्ररक्षण करणारा मोहित शर्मा आपल्या जागेपासून जरा लांब उभा होता. मोहित शर्मा आपल्या जागेवर उभा नसल्याचे पाहून हार्दिक पांड्या वैतागला आणि त्याने मोहित शर्माला रागात खडे बोल सुनावले.
सावधान! ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुणाने गमावले तब्बल ४० लाख रुपये, जमीनही विकली
यावेळी तो प्रचंड रागात होता. हार्दिक पांड्याचे असे वर्तन पाहून सर्वांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्यात विजयी झाल्यानंतर सुद्धा हार्दिक पांड्याने नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी तो म्हणाला की, “आम्ही ज्या स्थितीत होतो त्यावरून हा सामना एवढा अटीतटीचा होणं कौतुकास्पद नाही. या सामन्यात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. “
मोठी बातमी! भीमा पाटस कारखान्याप्रकरणी संजय राऊतांची दौंडमध्ये 26 एप्रिलला सभा
— Cricbaaz (@cricbaaz21) April 13, 2023