Harshvardhan Jadhav । दिल्ली : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना लगेचच तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले असता त्यावेळी जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला.
Ajit Pawar । आमदारांच्या निधी वाटपात ‘दादा’गिरी? अजित पवारांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…
गडकरींच्या निवासस्थानी दाखल होताच हर्षवर्धनजाधव (Harshvardhan Jadhav) यांना अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांना लगेचच आरएमएल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले आहेत. वेळीच रुग्णालयामध्ये दाखल केल्याने त्यांच्या जीवावरच संकट टळलं असल्याचे बोलले जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोका टळला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Adani Group । ब्रेकिंग न्यूज! गौतम अदानींनी विकली 1,600 कोटींची कंपनी
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समजताच त्यांचे कुटुंबीय दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जाधव यांच्यावर किती दिवस दिल्लीमधील रुग्णालयात उपचार सुरू असणार आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
JioBook laptop । आनंदाची बातमी! जिओ लाँच करणार स्वस्त लॅपटॉप, मिळतील जबरदस्त फीचर्स