Harshvardhan Patil । विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तोंडावर, इंदापूर मतदारसंघात (Indapur Constituency) राजकीय वातावरण ताणलेले आहे. महायुतीत जागा वाटपावरून सुरु असलेल्या गोंधळात, हर्षवर्धन पाटील यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. राजकारणात 40 वर्षांचा अनुभव असलेल्या पाटील यांनी नेतृत्वाला ठाम इशारा दिला आहे, “मला अडाणी समजू नका. विधानसभेत बदल होईल.” असं ते म्हणाले आहेत.
Congress । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा
पाटील यांनी इंदापूरमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, “इंदापूरच्या निवडणुकीची चर्चा आता तालुक्यापुरती मर्यादित नाही, तर ती राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे.” त्यांनी स्पष्ट केले की इंदापूरमध्ये मोठे परिवर्तन होईल, हे नागरिकांनी ठरवलं आहे.
Mumbai News | धक्कादायक! दहीहंडी उत्सवात मुंबई आणि ठाण्यात 238 गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर
आमदारकीसाठी त्यांच्या भूमिकेवर त्यांनी सांगितले की, “सध्या आमदारकीचाच विचार करायला सांगा. मंत्री पदाचा विचार नंतर करू.” असं ते म्हणाले आहेत. पाटील यांनी पुढील काळात अपक्ष निवडणुका लढवण्याच्या संभाव्यतेवर चर्चा करताना, “इंदापूर तालुका गेल्या दहा वर्षात विकासापासून दूर आहे. काळ बदलला आहे, मतदार हुशार झाला आहे. दोन-चार दिवसांत निर्णय घेईन,” असे सांगितले. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Post Office PPF scheme 2024 । पोस्ट ऑफिसची PPF योजना; पैसे गुंतवा आणि कोट्यधीश व्हा!