Harshwardhan Patil | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. इंदापूरमधील राजकारणात एक नवा वाद उफाळला आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीच्या जागावाटपात इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांना मिळणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले होते, ज्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज झाले होते. (Indapur News )
भरणे यांनी एका गावात ग्रामस्थांशी बोलताना थेट उमेदवारीची घोषणा केली, “मी तुमच्यासाठी मनापासून काम केले आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या,” असे सांगितले. यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे टेन्शन वाढले असून, राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. पाटील यांनी अजित पवार आणि भाजपच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत, इंदापूरच्या जनतेला दुखावण्याचा अधिकार नसल्याचा इशारा दिला आहे.
इंदापूरमधील आगामी निवडणुकीसाठी त्यांनी एक नवा इशारा देत, “अधिकारांच्या मुद्द्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली आहे,” असे म्हटले आहे. राजकीय घडामोडींच्या या वेगवान उलथापालथीमुळे इंदापूरच्या राजकारणात आगामी काळात कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..
Ajit Pawar | अजित पवारांच्या तब्येतीत बिघाड, डाॅक्टरांनी दिली मोठी अपडेट