Haryana Chunav Results 2024 | हरियाणा विधानसभा निवडणुकीतील निकालात अचानक वळण आले आहे. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसने चांगली आघाडी घेतली होती, परंतु दुसऱ्या राऊंडनंतर भाजपने दमदार कमबॅक करत आघाडी घेतली आहे. सध्या भाजप 38 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 31 जागांवर पुढे आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चा वाढली आहे, कारण यामध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Ajit Pawar । मोठी बातमी! अजित पवार बारामती नव्हे तर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
सकाळी काँग्रेस 67 जागांवर विजयाची अपेक्षा करत होती आणि पार्टीने आनंद साजरा करण्यासाठी मुख्यालयाबाहेर मिठाई वाटप केले होते. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी भाजपवर टीका करत म्हटले की, “आम्ही मोदींना जिलेबी पाठवणार आहोत.” मात्र, भाजपच्या आघाडीने काँग्रेसच्या आनंदात पाणी फेरलं आहे.
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भूपेंद्र हुड्डा, कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्यात रस्सीखेच होणार आहे. 10 वर्षांच्या विश्रांतीनंतर काँग्रेस सत्तेत येण्याची आशा बाळगून असताना, भाजपने हॅटट्रिक साधण्याची तयारी दाखवली आहे. मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये कोणता पक्ष विजयी होईल, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Bjp । भाजपला मोठा धक्का! हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात केला प्रवेश