मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिले की, आज सकाळी जीम ला चाललो होतो अचानक समोर ३ महिला भगिनी हातात कोयता घेवून दिसल्या, मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का? की मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या.
बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देताच भाजपने दिली खुली ऑफर!
मी थोडा त्यांचे मागे गेलो तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या, पण मागील आठवड्यात आमच्या कात्रज गावठाण मध्ये सकाळी ६:०० वा. भर रस्त्यावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरून चोर रस्त्याने चक्क पळत गेला.
अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर सणसणीत टीका; म्हणाले, “हे निर्णयशून्य सरकार….”
जर पोलिसांनी कडक कारवाई नाही केली तर मग असे चित्र दिसले तर नवल वाटून घेवू नये. अशी पोस्ट मनसे नेते वसंत मोरे यांनी केली आहे. सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
राहुल कलाटे यांना बंडखोरी पडणार महागात! शिवसेनेतून हाकलपट्टी होण्याचे संकेत