
काल २५ ऑक्टोबर रोजी व्हॉट्सअॅप (WhatsApp) जवळपास दोन तास बंद पडले होते. व्हॉट्सअॅप हे एक मेटा कंपनीचं मेसेजिंग अॅप आहे. पण काल हे व्हॉट्सअॅप कशामुळे बंद झालं? का व्हॉटसप हॅक झालं होतं? याविषयीचा अहवाल आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मागवला आहे.
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कुसुम सोलर पंप, ‘असा’ करा अर्ज
मेटा कंपनीला याप्रकरणामुळे मंत्रालयाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले आहे. दिड ते दोन तासांपर्यंत व्हॉटसप नेमकं का बंद होतं?, यामागचं कारण मेटा कंपनीकडून मंत्रालयाने मागितलं आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून मंत्रालय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे आता मेटा कंपनीला सविस्तर अहवाल सादर करणे बंधनकारक असणार आहे.
खुशखबर! आता ‘या’ नागरिकांना एस-टी मध्ये करता येणार विना टिकिट मोफत प्रवास
दरम्यान, या समस्येबाबत काल मेटा (Meta) कंपनीने स्पष्टीकरणंही दिलं आहे. काही तांत्रिक कारणामुळे सर्व्हर डाऊन झाल्याचं सांगण्यात येत आहे. मेटाचे इंजिनिअर्स यावर काम करत असल्याची माहिती देखील सांगण्यात आली आहे.
जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती माहिती आहे का? 50 वर्षांपासून केली नव्हती अंघोळ; पाहा PHOTO