Mobile Hacked Sign । तुमचाही फोन हॅक झालाय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Has your phone been hacked? Remember 'these' things

Mobile Hacked Sign । सध्याच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत स्मार्टफोन वापरतात. स्मार्टफोनमुळे अनेक कामे चुटकीसरशी कामे (Smartphone Use) होऊ लागली आहेत. यामध्ये आपली अनेक महत्त्वाची आणि वैयक्तिक माहिती असते. जर तोच हरवला किंवा हॅक झाला तर? तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. (Smartphone Tips)

Sana Khan । सना खान हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, मृतदेहाच्या शोधासाठी घेतला मोठा निर्णय

सर्वसामन्य लोकही हॅकर्सच्या रडारवर असतात. त्यामुळे आपण स्मार्टफोनबाबत सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. अनेकांना आपण वापरत असणारा स्मार्टफोन हॅक (Smartphone Hacked) झाला आहे हे लवकर लक्षात येत नाही. परंतु तुम्ही आता काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन हॅक झाला आहे की नाही हे समजायला मदत होईल आणि तुमचे नुकसान होणार नाही. (Latest Marathi News)

Maize insect । ‘या’ सोप्या पद्धतीने करा मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन, होईल फायदा

लक्षात ठेवा या गोष्टी

फोन गरम होणे

अनेकदा स्मार्टफोन गरम होतो. वापरकर्त्यांनाही ते समजत नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार, फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये मॅलिशियस अॅप्लिकेशन चालू असल्यामुळे फोन गरम होतो. तसेच सतत स्मार्टफोन रेडिएशनवर लक्ष ठेवावे.

Pune Metro । पुणेकर मेट्रोच्या प्रेमात! एकाच दिवसात केला ‘इतक्या’ प्रवाशांनी प्रवास; आकडा वाचून व्हाल थक्क

बॅटरी लाइफ

सतत फोन गरम झाल्यामुळे त्याचा बॅटरीवर परिणाम होतो. असे झाल्याने बॅटरी त्याच्या वयापेक्षा कमी चालते. सिस्टीम अपडेट असेल तर अशी समस्या निर्माण होत नाही.

Rozgar Mela । नरेंद्र मोदींच्या हस्ते 51 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती पत्र

अनोळखी नंबरवरून मेसेज

बऱ्याचवेळा वापरकर्त्यांना अनोळखी नंबरवरून मेसेज येतात. तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना हे मेसेज जातात जे तुम्ही पाठवलेले नसतात. त्यावेळी आपला फोन हॅक झाला आहे असे समजावे. त्यामुळे तुम्हाला आकर्षित करणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर चुकूनही क्लिक करू नये.

Political News । महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेस आमदार, खासदार अस्वस्थ; भाजपच्या बड्या खासदाराच्या दाव्याने खळबळ

स्मार्टफोनचा वेग कमी होणे

समजा तुमचा फोन स्लो चालत असेल तर त्यात व्हायरस आलेला आहे असे समजावे. त्याचा परिणाम तुमच्या स्मार्टफोनच्या स्पीडवर आणि परफॉर्मन्सवर होतो. इतकेच नाही तर फोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या नियमित अपडेट्समुळे देखील असे होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar । सत्तेसाठी नाही तर ‘या’ कारणामुळे अजित पवार भाजपसोबत, महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचा दावा

लक्षात ठेवा या गोष्टी

  • विश्वासू कंपनीचा अँटी व्हायरस इन्स्टॉल करा.
  • मोफत वाय-फायच्या शोधात सगळीकडे फोन अॅड करणे टाळावे.
  • तुमचा फोन सतत अपडेट करा.
  • तसेच फोनच्या रेडिएशनवर लक्ष ठेवा.

Social Security । कोट्यवधी ग्राहकांसाठी SBI ने आणली नवीन सेवा, होणार मोठा फायदा

Spread the love