Site icon e लोकहित | Marathi News

Havaman Andaj : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ भागांमध्ये यलो अलर्ट

Heavy rain in the state for the next four days; Yellow alert in 'these' areas

Havaman Andaj : जुलै महिन्यातील पंधरा दिवस गेले आहेत तरी देखील राज्याच्या काही भागात म्हणावा असा पाऊस (Rain) झाला नाही. त्यामुळे अनेक भागात पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस कधी पडणार? अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. संपूर्ण विदर्भासाठी पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी केला असून सर्वच जिल्ह्यांत पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । अजित पवारांनी पुन्हा एकदा डोळा मारला? नेमका कोणाला मारला डोळा? व्हिडीओही झाला व्हायरल

त्याचबरोबर यावर्षी मराठवाड्यामध्ये देखील अत्यंत बिकट स्थिती आहे. या ठिकाणी खूप कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत आहेत. मात्र पुढील दोन दिवस मराठवाड्यात देखील काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर उद्या तळ कोकणासह उत्तरमहाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई आणि उपनगरात 18 जुलैपासून जोरदार पावसाची शक्यता आहे.

जेवणात टोमॅटो वापरल्याने बायकोला आला राग, केलं असं काही की.. तुम्हाला बसेल धक्का

राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. बऱ्याच ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. तर ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट घोंगावत आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकरी काहीसा सुखावणार आहे. (Havaman Andaj)

धक्कादायक! विषबाधा होऊन ४१ जनावरांचा मृत्यू

राज्याच्या काही भागात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी अद्यापही दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे पेरण्या देखील झालेल्या नाहीत. कोकण विभागात 17 टक्के, नाशिक विभागात 59 टक्के, लातूर विभागात 61 टक्के, नागपूर विभागात 51 टक्के, अमरावती विभागात 77 टक्के, कोल्हापूर विभागात 30 टक्के तर पुणे विभागात 31 टक्के, पेरण्या झाल्या आहेत.

“जर टोमॅटो खाल्ला नाही तर सुनील शेट्टी काही मरणार नाही”, रविकांत तुपकर चांगलेच संतापले

Spread the love
Exit mobile version