Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

Yellow alert today for 'these' districts in the state; Know your district update

Havaman Andaj । सप्टेंबर महिना सुरू होताच पावसाला थोड्याफार प्रमाणात सुरुवात झाल्याची पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. सध्या राज्यात पावसाचे पुनरागमन झाल्याचे चित्र दिसत आहे. काल अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली त्याचबरोबर आज देखील राज्यभरामध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Havaman Andaj)

Baramti News : जालना घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक; जाणून घ्या मोर्चाचा मार्ग

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maratha Reservation । “फडणवीसांची भाजपमधून हकालपट्टी करा, नाहीतर ते मराठ्यांना गोळ्या घालून मारतील”

त्याचबरोबर ७ सप्टेंबर पर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे खरीप पीक वाया जाणार नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच धरणे, नदी, नाले पाण्याने भरावीत अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

Sonia Gandhi । बिग ब्रेकिंग! सोनिया गांधी यांची तब्बेत अचानक बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

काल बारामतीमध्ये मुसळधार पाऊस

अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर काल बारामती मध्ये चांगला मुसळधार पाऊस झाला आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे बारामतीकरांची उकाड्यापासून सुटका देखील झाली आहे. काल जवळपास दोन तास बारामती मध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.

Eknath Shinde । आताची सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या 5 सर्वात मोठ्या घोषणा

अनेक गावे पावसाच्या प्रतीक्षेत

राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये तसेच शहरी भागांमध्ये जरी पाऊस पडला असला तरी ग्रामीण भागातील अनेक गावे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अजूनही ग्रामीण भागातील असे अनेक गावे आहेत ज्या ठिकाणी म्हणावा असा पाऊस पडला नाही त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मुसळधार पाऊस पडावा असे त्या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे.

Pune Bharti 2023 । नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पुण्यात ‘या’ ठिकाणी सुरु आहे बंपर भरती

Spread the love