Havaman Andaj । पुणे : अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भर पावसाळ्यातच पाऊस गायब झाल्याने अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत नवीन अपडेट (Weather Update) दिली आहे त्यामुळे सर्वांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (IMD Update)
Gautami Patil । सर्वात मोठी बातमी! नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वडिलांचे निधन
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात आजपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. सध्या पावसाला पोषक अशी स्थिती तयार झाली आहे. कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत जात आहे, त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) पडणार आहे. पुढील पाच दिवस राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळेल. (IMD Alert)
Maratha Reservation । मराठा आंदोलनासाठी स्वत:ची जमीन विकणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत? जाणून घ्या
दरम्यान, उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे तयार होत असल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असून पुणे घाट विभागामध्ये दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या महिन्यामध्ये हवामान खात्याने 91 ते 109 टक्के पाऊस पडेल अंदाज व्यक्त केला आहे.
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार कुकडीचे आवर्तन
धरणातील पाणीसाठ्यात होणार वाढ
मागील महिन्यात पुणे आणि परिसरामध्ये 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. या महिन्यात हे चित्र बदलेल. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या जोरदार हजेरीने शेतकऱ्यांवरचे संकट टळू शकते. धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होईल.