Havaman Andaj । महाराष्ट्रातील हवामानात बदलाची लहर येत असून, नैऋत्य मोसमी पावसाने राज्यातून काढता पाय घेतला असला तरी काही ठिकाणी अद्याप पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या पावसाचा विशेष इशारा देण्यात आलेला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा किनारपट्टीकडे चालले आहे. यामुळे नेल्लोर आणि पुदुच्चेरी जवळ या कमी दाबाचं क्षेत्र धडक देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्येही पावसाची शक्यता वर्तवली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातही पुढील पाच दिवसांत पावसाचे प्रमाण वाढणार आहे.
Ajit Pawar । इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
हवामान विभागाने विशेषतः सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 17 ते 23 ऑक्टोबर दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे.
अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाचे थैमान सुरू असून, हवामान विभागाच्या वर्तमनानुसार शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसामुळे काही ठिकाणी निसर्ग आपत्तीचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.