Site icon e लोकहित | Marathi News

Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Havaman Andaj

Havaman Andaj । महाराष्ट्रात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (Department of Meteorology) पुढील चार दिवसांसाठी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Havaman Andaj)

Akshay Shinde | ‘आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही…” पोलीस संजय शिंदेे यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

हवामान खात्याकडून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड यांसारख्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Akshay Shinde Encounter । अक्षय शिंदेची ‘गेम’ करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे नेमके कोण? वाचा माहिती

वसई-विरारमध्ये रिमझिम पावसासह जोरदार पाऊस पडत आहे. पालघरमध्ये पावसाने आणि वाऱ्याने मोठे नुकसान केले आहे. अहमदनगरमध्ये सीना नदीला पूर आल्याने नगर-कल्याण महामार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. सोलापुरातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Sharad Pawar । आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर शरद पवारांनी दिली धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाले…

पुण्याच्या भोर तालुक्यात माझेरी गावात वादळी वाऱ्यामुळे गोठा कोसळला, ज्यामुळे पाच जनावरे जखमी झाली. यामुळे शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. पुढील दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होईल की नाही, हे हवामान खात्याच्या पुढील अंदाजावर अवलंबून असेल.

Lava Blaze 3 5G भारतात लॉंच; बजेटमध्ये उत्तम, जाणून घ्या किंमत?

Spread the love
Exit mobile version