Havaman Andaj : मोठी बातमी! राज्यभर पावसाचा जोर अजून वाढणार; नेमकं काय आहे कारण?

Havaman Andaj : Big news! The intensity of rain will increase across the state; What exactly is the reason?

Havaman Andaj : मागच्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान राज्यभर सुरू असलेल्या या पावसाचा जोर सोमवारी कायम होता मंगळवारी सकाळपासून पुन्हा बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. पुणे, सातारा, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज देण्यात आला आहे. तर विदर्भ, खानदेश, मराठवाडा या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.

ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केल्या तीन धडाकेबाज घोषणा; वाचा एका क्लिकवर

राज्यात नेमका का पावसाचा जोर वाढणार?

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पश्चिम किनारी, कोकण, त्याचबरोबर विदर्भातील काही भाग आणि मराठवाडा, तेलंगणासह ओरिसाच्या काही भागात 25 ते 28 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. (Havaman Andaj)

CSK Captaincy । चेन्नईचा भावी कर्णधार कोण? धोनीच्याच जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा

दरम्यान, ठीक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. कोल्हापूर मधील स्थिती पाहिली तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काही उसंत घेतली आहे. पंचगंगा नदीची पातळी गेल्या सात दिवसापासून स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर राधानगरी धरण 94 टक्के भरले आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

Urfi Javed viral video । कपड्यांवरून उर्फी जावेदला काकांनी सुनावले अभिनेत्री थेट म्हणाली; “तुझ्या बापाचे…”

Spread the love