Havaman Andaj । एकीकडे बंगालच्या उपसागरात रेमाल चक्रीवादळाचा कहर सुरूच आहे, तर दुसरीकडे या वादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात चक्रीवादळामुळे अनेक घरांची पडझड झाल्याचंही वृत्त आहे. चक्रीवादळामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. टिनपत्रे उडल्याने एका व्यक्तीचा हातही कापला गेला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने सरकणाऱ्या रेमलशी संबंधित आहे की नाही हे सांगणे कठीण आहे.
Ghatkopar Hoarding Case । घाटकोपर होर्डिंग घटनेतील आरोपीला मोठा धक्का, कोर्टाने वाढवली पोलिस कोठडी
अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आर्णी, महागाव तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. आर्णी तालुक्यातील पाभळ आणि महागाव तालुक्यातील तिवरंग, खळी मलकापूर हे चक्रीवादळाच्या तडाख्यात आहेत. पाभळ येथे 25 घरांची पडझड झाली आहे.
चक्रीवादळामुळे हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. झाडे पडल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आर्णीच्या पाभळ गावाला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
जळगावात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान
जामनेर, जळगाव येथे अवकाळी पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यातील कापूसवाडी, देऊळगाव, फत्तेपूर अशा अनेक गावांमध्ये पाऊस व वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस वाडीत अवकाळी पावसाने केळीच्या तीन मोठ्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.