Havaman Andaj । पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; मुसळधार पावसाचा अंदाज

Rain

Havaman Andaj । महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसानं कहर केला आहे, आणि पुढील 48 तास राज्यात अत्यंत सतर्कता आवश्यक आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या राज्यभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील, आणि मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वाऱ्यांचा वेग 30-40 किमी प्रतितास असू शकतो, आणि त्यामुळे पावसाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

Dahi Handi festival | दहीहंडीचा उत्सव: मुंबईत भव्य कार्यक्रम आणि पुण्यात वाहतूक बदल

कोकणात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे, स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागात वाऱ्याचा वेग आणि पावसाची तीव्रता यामुळे स्थानिक प्रशासनाने आधीच तयारी केली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj । मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला, मुख्यमंत्री शिंदेंनी दिली मोठी प्रतिक्रिया

विदर्भात आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळासह पावसाची शक्यता असल्यामुळे, नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Politics News । राजकारणात मोठा भूकंप? महायुतीचे बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

मराठवाड्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळासह पावसाची शक्यता असल्यामुळे, नागरिकांनी सतर्क रहावे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. सर्व विभागांनी वादळ आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती तयारी केली पाहिजे, आणि नागरिकांनी घरात सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

Apple iPhone 16 | गुडन्यूज! ‘या’ तारखेला लॉन्च होणार आयफोन 16?

Spread the love