Havaman Andaj । ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने विश्रांती घेतली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र ऑगस्ट महिना संपत आला तरी अजूनही पाऊस झालेला नाही, विश्रांती घेतलेल्या पावसाची परतण्याची कोणतीही चिन्हे ऑगस्ट महिन्यात नसल्याच हवामान विभागाने दोन दिवसापूर्वी म्हटले होते. मात्र शुक्रवारी रात्रीपासून वातावरण बदलले असल्याचे पाहायला मिळते आहे. शुक्रवारी रात्रीपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून मुंबईत देखील रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. (Havaman Andaj)
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शनिवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. माहितीनुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमे वाऱ्याची गती वाढली असल्यामुळे पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला येलो अलर्ट असणार आहे.
Political News । प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
त्याचबरोबर विदर्भामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. पुणे आणि आसपासच्या भागात पुढच्या तीन दिवस रिमझिम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 48 तासात राज्यात हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे.
मुंबईत पावसाला सुरुवात
मुंबईमध्ये देखील पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती त्यानंतर आता परत एकदा पावसाने हजेरी लावल्याचे पाहिला मिळत आहे. मुंबई उपनगरच्या कांदिवली, मालाड, बोरिवली, गोरेगाव परिसरामध्ये काल रात्रीपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Agriculture News | कोथिंबीरीला भाव नसल्याने शेतकऱ्यानं एक एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटर