Havaman Andaj | राज्यात मान्सून उशिरा दाखल झाला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये म्हणावा असा पाऊस पडला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबल्या. मात्र राज्यात आता गेल्या दोन, तीन दिवसांपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे (FArmer Happy) वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तरस शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग देखील सुरु झाली आहे. (Agriculture News)
पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद गेला विकोपाला, पतीने मध्यरात्री केले धक्कादायक कृत्य की …
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पाऊस असाच राहणार आहे. यामुळे धरणांमधील जलसाठा वाढणार आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यात (Lonavala) गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी गेल्या 24 तासांत तब्बल 214 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु
मागच्या काही दिवसापासून पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी पेरण्या करून त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती. मात्र आता काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी पाऊस झाला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
Kirit Somaiya । किरीट सोमय्यांनी दिली कथित अश्लील व्हायरल व्हिडिओवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…..