Havaman Andaj । जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाचा जोर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे दिसत आहे. राज्यात 13 ऑगस्ट पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. (Weather Update)
Bhimashankar Temple । भीमाशंकरला दर्शनाला जाताय? एकदा ही नियमावली पहाच
कोकण भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 15 ऑगस्ट पासून सर्वदूर पाऊस पडणार असून मान्सूनच्या नवीन पद्धतीने राज्यांमध्ये कमी वेळेमध्ये अधिक पाऊस होणार आहे. (Havaman Andaj)
Reserve Bank of India । मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने ‘या’ चार बँकांना ठोठावला दंड, केली मोठी कारवाई
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चार ऑगस्टपर्यंत राज्यात तुरळठिकाणी पाऊस पडला होता. मात्र 4 ऑगस्ट पासून ते नऊ ऑगस्ट पर्यंत अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. माहितीनुसार राज्यांमध्ये एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत असल्याचे भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे.
Ved । कौतुकास्पद! रितेश देशमुखच्या ‘वेड’निमित्त स्टार प्रवाह वाहिनीने केली अनोख्या विक्रमाची नोंद
बहुतांश शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
सध्या बऱ्याच ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांना अजूनही मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. राज्यातील काही जिल्हे असे आहेत ज्यामध्ये अजूनही मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांना आगामी काळामध्ये पाणी कसे द्यावे असा तेथील शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत.
Tomato Price Hike । नारायणगावचे टोमॅटो पुन्हा चर्चेत! किलोला मिळतोय ‘इतका’ भाव