Havaman Andaj । ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार सप्टेंबर महिना चालू झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी पावसाला सुरुवात देखील झाली होती. मात्र कालपासून पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे बळीराजा आता चिंतेत आहे.
Thackeray Group । ठाकरे गोटाला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला पदाचा राजीनामा
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस एक ते दोन दिवस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार नाही. तर मंगळवारी राज्यभर पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
असं असलं तरी बुधवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर मुसळधार पाऊस पडावा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. त्यामुळे सध्या पिकांना पाण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Bank Deposit । काय सांगता! रातोरात ४० जण झाले लखपती, अचानक खात्यात आले २ लाख रुपये