Havaman Andaj । पुणे : ऐन पावसाळ्यातच पावसाने राज्याकडे (Rain in Maharashtra) पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जेमतेम पाण्यावर आलेली पिके कशी जगवायची असा प्रश्न निर्माण हो लागला आहे. आहे. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) पावसाबद्दल नवीन अपडेट दिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Weather Update)
सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे प्रदीर्घ विश्रांतीनंतर येत्या पाच ते सात दिवस पुणे परिसरात पुन्हा एकदा पावसाची (Heavy Rain in Maharashtra) बॅटिंग पाहायला मिळेल. पुणे घाट विभागामध्ये दोन दिवस यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच नाशिक, सातारा जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवली आहे. (Latest Marathi News)
Sharad Pawar । “भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग होतोय” शरद पवारांचा गंभीर आरोप
भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातदेखील दोन दिवस पावसाचा जोर वाढू शकतो. कोकण किनारपट्टीलगत पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळणार आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
धरणातील पाणीपातळी
५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाच्या दमदार हजेरीने राज्यावरचे दुष्काळाचे सावट टळू शकते. या महिन्यात ९१ ते १०९ टक्के पाऊस पडू शकतो. त्याशिवाय आता या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत देखील वाढ होऊ शकते.
Sharad Pawar । शरद पवारांनी मोदी सरकारला दिला मोलाचा सल्ला म्हणाले; “त्यावर …”